कांद्याला ५२ रुपये प्रती क्विंटल भाव, शेतकऱ्याने कांदा फेकला रस्त्यावर

Foto

वैजापूर- दिवसेंदिवस कांद्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. बुधवारी तालुक्यातील चा॑डगाव येथील शेतकऱी प्रमोद गायकवाड यांनी कांद्याला ५२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने ३० क्विंटल कांदा रस्त्यावर फेकून दिला.

कांद्याला राज्यभरात सध्या अत्यंत कमी भाव मिळत आहे. यामुळे लागवडीचा खर्च देखील भरून निघत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहे. वैजापूर तालुक्यातील शेतकरी प्रमोद गायकवाड यांनी कांदा विकायला काढला, पण त्याला ५२ रुपये प्रती क्विंटल इतका कमी भाव मिळाल्याने त्यांनी ३० क्विंटल कांदा रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला.